कानपूरमध्ये तब्बल 100 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटा गादीमध्ये होत्या. अशा तीन गाद्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.एका बिल्डर आणि कपडा व्यापाऱ्याच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली. यात जुन्या नोटा बदलून देणाऱ्यांचं रॅकेट असल्याचा संशय आहे.एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा असल्याची माहिती कानपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून आधी 80 कोटीच्या नोटा जप्त केल्या. आता हा आकडा 100 कोटीपर्यंत पोहोचला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews